कवठे येमाई येथे अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

ओळख पटवण्यासाठी शिरूर पोलिसांकडून आवाहन

0

टाकळी हाजी |

कवठे येमाई ( ता. शिरूर) गावाच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिराशेजारील स्मशानभूमीच्या भिंतीलगत मंगळवारी (दि. २४) एक अनोळखी पुरुष जातीचा इसम निपचित अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी तत्काळ १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावले व संबंधित इसमास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून, त्याची उंची पाच फूट सहा इंच आहे. त्याचा बांधा निमगोरा आहे. मृताच्या उजव्या हाताच्या मनगटावर हेरेश असे गोंदवलेले नाव आढळून आले आहे. तसेच उजव्या हातात पांढऱ्या धातूचा कडा आणि काळ्या रंगाचा रबर होता. मृत इसमाने अंगावर काळ्या रंगाचा चौकडी फुल बाह्याचा शर्ट, काळ्या रंगाचे फुल बाह्याचे जर्किन, आणि काळी पँट परिधान केली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, कोणी या इसमाला ओळखत असेल किंवा त्यासंदर्भात माहिती असेल तर शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल आगलावे (मो. ८२०८७५१५१६) व शिरूर पोलीस स्टेशन (फोन: ०२१३८-२२२१३९) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.