शिक्रापूर पोलिसांनी अखेर केला ‘त्या’ खुनाचा गुन्हा उघड

पोलिस कर्मचारी गजानन खत्री व पत्रकार अरुणकुमार मोटे यांच्या पाठपुराव्याला यश

0

शिरूर : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत १० मार्च २०२४ मध्ये अज्ञात बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या व्यक्तीचा खुन झाला होता. परंतु या प्रकरणी वरीष्ठांनी मयताला कोणी वारस नसल्याने तपास न करता आर्थिक तडजोड करून प्रकरण दाबले होते. अशी लेखी तक्रार पोलिस स्टेशनमधील गजानन खत्री या पोलिस हवालदाराने पोलिस अधिक्षकांकडे केली होती. खत्री यांच्या विषयी चुकीची माहिती पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आली होती त्यामुळे खत्री यांच्या पत्राला न्याय मिळत नव्हता.

गोपनीय सुत्रांमार्फत माहीती मिळाल्याने पत्रकार अरुणकुमार मोटे यांनी घटनास्थळी भेट घेत सत्य माहीती जाणून घेतली. सदरचा प्रकार खरा असल्याने निर्भिड व सडेतोडपणे लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवला. आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून गजानन खत्री याच्या अर्ज चौकशीला वेग प्राप्त झाला. अखेर या लढयाला यश आले असून शिक्रापूर पोलिसांनी तब्बल १० महीन्यांनी गुन्ह्याची उकल करत माधव दशरथ करडे ( रा.सुंब,ता. बार्शी जि. सोलापूर. हल्ली रा. सणसवाडी ) या इसमाचा खुन झाल्याचे निष्पण करत महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले असल्याची माहीती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे.

यातील एक आरोपी फरार आहे. या गुन्हयाची उकल होणे कामी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले हे दोन दिवस शिक्रापूर पोलिस स्टेशनला ठाण मांडून होते. अखेर अज्ञात मयत व्यक्तीला न्याय मिळवून देत खुनाला वाचा फोडल्याने पत्रकार व ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा संस्थेचे शिरुर तालुका अध्यक्ष अरूणकुमार मोटे व कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी गजानन खत्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलीस कर्मचारी गजानन खत्री व पत्रकार अरुणकुमार मोटे यांच्या धाडसी कामगिरीमुळे एका खुन झालेल्या व्यक्तीला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांचे शिरूर तालुक्यातील नागरीकांच्या वतीने खूप खूप आभार …
सिमाताई पवार, सामजिक कार्यकर्त्या

Leave A Reply

Your email address will not be published.