शिरूर तहसिल कार्यालयात तब्बल १३ पदे रिक्त

रिक्त पदांमुळे होतेय सर्वसामान्य जनतेची होतेय ससेहोलपट

0

शिरूर |प्रतिनिधी (ता. १७)

शिरूर तहसील कार्यालयात मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात असून महसूल सहाय्यक , अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त आहेत. जनहित लक्षात घेऊन लवकरात लवकर उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी दिला आहे.

शिरूर तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून तालुकाभरातून आलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे रिक्त पदांमुळे अवघड बनले आहे. निलेश वाळुंज यांनी याबाबतची माहिती घेत रिक्त पदे भरण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

शिरूर तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांची अनेक पदे रिक्त असून एकीकडे काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे जनतेची होणारी ससेहोलपट तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने व काही अधिकाऱ्यांवरती अतिरिक्त अनेक कार्यभार असल्याने सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांना मात्र तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरीकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान होत आहे.

सदर रिक्त पदे जनहितास्तव गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्वरित भरण्यात यावीत आणि याप्रकरणी जनहित लक्षात घेऊन उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन, उपोषण करावे लागल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार तथा ग्राहक पंचायत शिरूर तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, साहेबराव लोखंडे आदी उपस्थित होते. सदर निवेदन अधिक माहितीस्तव विभागीय आयुक्त यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे.

रिक्त जागांचा तपशील
. महसूल सहाय्यक यांची एकुण मंजूर पदे १७ असून कार्यरत पदे ७ आणि रिक्त पदे तब्बल १० आहेत.

. अव्वल कारकुन यांची एकुण मंजूर पदे ०९ आहेत. कार्यरत पदे ७ तर रिक्त पदे २ दोन आहेत.

. मंडल अधिकारी यांची एकु मंजूर पदे १० आहेत. कार्यरत ९ व रिक्त पद १ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.