शिरुर पोलिसांनी ३५ बुलेट सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर
सायलन्सर मधुन फटाके फोडणा-या व कर्कश आवाज करणाऱ्यांवर वाहतुक शाखेची धडाकेबाज कारवाई
टाकळी हाजी |
शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या तसेच कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर शिरुर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाई करत बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर फिरविला. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक,व्यापारी आणि प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
वाहतूक शाखेच्या पथकाकडून महाविदयालयीन मुलींच्या अडचणी जाणुन घेणे, तसेच रोडरोमीयो यांचेवर कारवाई करताना एकुण ३५ बुलेट मोटारसायकल ताब्यात घेवुन त्यांचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. सोमवारी ( दि. १८) जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करण्या-या बुलेट मोटारसायकलचे साईलेन्सरवर नियोजित नवीन पोलीस स्टेशन जवळ रस्त्यावर बुलडोझर फिरवण्यात आला.
ही कारवाई शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, ज्ञानदेव गोरे, विकी मैंद यांचे पथकाने केली.
शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागामधील चार चाकी वाहनांचे काळया काचांचे फिल्मींग असल्यास गाडीच्या काचेचे फिल्मीग जागेवरच फाडून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
….. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक शिरूर