पारनेर : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९९.५८ टक्के लागला असून, आदित्य बाबासाहेब सुंबे याने ९८.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी विद्यालयातून एकूण २४० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ एका विद्यार्थ्यामुळे विद्यालयाचा १०० टक्के निकाल हुकला. मात्र, गुणवत्तेच्या बाबतीत विद्यालयाने आपला दबदबा कायम ठेवत तब्बल २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

विद्यालयातील गुणवत्ता यादीत आदित्य बाबासाहेब सुंबे याने ९८.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक ,समीक्षा चंद्रकांत गट हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय, अस्मिता सचिन पोटे हिने ९६.२० टक्क्यांसह तृतीय, वेदांती संतोष औटी हिने ९५.४० टक्क्यांसह चतुर्थ, तर गौरी राहुल सोंडकर हिने ९४.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भार्गवी शिरोळे, अभिराज गाजरे, सुयश सोबले, पार्थ झावरे, स्वरित नगरे, समीक्षा भिसे, त्रिवेणी गाडगे, अमन इनामदार, साहिल वाळुंज, प्रमिला शिंदे, आशुतोष गायकवाड, सोहम दातीर, सुयश चौरे, ओम आंबेकर, दिशा औटी आणि अर्णव रणदिवे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल अ.जि.म.वि.प्र. समाजाचे अध्यक्ष रा. ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेकजी भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेशदादा मुळे, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त नंदकुमार झावरे, सीतारामजी खिलारी तसेच संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ सर, उपप्राचार्य के.बी. शिंदे सर व पर्यवेक्षक इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.