साबळेवाडी येथे तेरा घरकुलांचे भूमिपूजन
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील साबळेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३ घरकुलांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.१४) टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे,सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सरपंच अरुणाताई घोडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे, उपसरपंच मोहन चोरे, ग्रा पं. सदस्य बाबाजी साबळे, विलास साबळे, पंढरी उचाळे,भाऊसाहेब साबळे, सुभाष चोरे, साबळेवाडी सोसायटीचे संचालक राजू साळवे, किशोर बारहाते ,अंकुश शितोळे,सुखदेव साबळे, भगवान साबळे, भानुदास साबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साबळेवाडी येथे गरजू लाभार्थी यांना निवारा उपलब्ध होणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या सर्वांना पहिला हप्ता प्राप्त झाला असून पायाभरणी केल्यानंतर दुसरा हप्ता मिळणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी सांगितले.