संत साहित्य समता ,बंधुता ,एकता निर्माण करणारी कार्यशाळा बनताहेत एनएसएसची शिबिरे ..
ह. भ. प. अशोक महाराज शिंदे यांचे प्रतिपादन
निघोज : सत्यशोध न्युज
संतांनी हजारो वर्षांपासून मानव जातीला दिशा देण्याचे काम केले आहे. परिस्थितीनुसार विज्ञानाभुमुख व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांनी प्रवचन, कथा, भारुड, कीर्तन याद्वारे फार मोठे कार्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गाडगेबाबा आदी संतांनी समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे ,अज्ञानाकडून ज्ञानाकडे व अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे घेऊन जाण्याचा मार्ग दाखविला आहे. एनएसएसची शिबिरे संत साहित्याचे अवलोकन करून समता ,बंधुता ,एकता निर्माण करणारी कार्यशाळा बनताहेत.असे प्रतिपादन ह.भ. प. अशोक महाराज शिंदे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर चिंचोली ( ता.पारनेर) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या तिसऱ्या दिवसाचे विचार पुष्प गुंफण्यासाठी ह. भ. प. प्रा अशोक महाराज शिंदे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी संत साहित्याच्या मार्गावरून चालताना माणसाने कोणत्या स्वरूपाचे गुण वैशिष्ट्य आपल्यामध्ये रुजवावेत याविषयीचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका शिवसेना ( उबाठा) तालुकाध्यक्ष श्रीकांतअण्णा पठारे होते. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना चरक संहितेपासून ते धन्वंतरीपर्यंत आणि आजच्या वैद्यकीय क्षेत्रापर्यंत झालेली प्रगती व संतांनी दिलेला समतेचा संदेश याविषयी विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले. त्यांनी आयोजित केलेले आरोग्य शिबिरे त्यातून त्यांना आलेला समाजातील दारिद्र्य, अंधश्रद्धा यावरही संतांची भूमिका त्यांनी स्वयंसेवकांना समजावून सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर एरंडे ,सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गोरक्ष घोलप, प्रा. नम्रता थोरात, प्रा. वृशाली जगदाळे, प्रा. सुरेश गाडेकर, प्रा. नीलिमा घुले, प्रा. सुप्रिया लंके, प्रा. पूनम गंधाते आदी प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन शिवनेरी ग्रुपने केले. प्रास्ताविक कुमार प्रतिक जाधव, आभार अभिजीत गोरडे व सूत्रसंचालन प्रतीक जाधव यांनी केले.