जमिन सुपिकता वाढीसाठी ऊस पाचट व्यवस्थापन हा शास्वत उपाय

पाचट न जाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे 

वारवांर एकाच क्षेत्रात ऊस पिक घेतल्याने अयोग्य पाणी व्यवस्थापन व कमी होणारे सेंद्रिय कर्बांचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा शाश्वत उपाय असल्याचे कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे यांनी सांगितले.

टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथे शशीकांत ढगे यांच्या शेतावर ऊस पाचट पाहणी करण्यात आली. या परिसरात प्रामुख्याने ऊस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.कृषी विभागामार्फत येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी बोलताना शैणखताची उपलब्धता कमी झाल्याने व पाचट जळाल्याने जमिनितील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटत चालले आहे. पाचट जाळुन न टाकता ते एका आड एक सरी कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्के पर्यंत कमी होऊ शकतो . तसेच जमिनित सेंद्रिय घटकाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकते ,अन्नद्रव्ये व्यवस्थापन खर्चात बचत होते तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व दोन पाण्याच्या पाळ्यात अंतर वाढते.असे परांडे यांनी सांगितले.

पाणी बचत, तण उगवत नाही व तणनाशकावरील खर्च वाचतो. एका एकरात सर्वसाधारण ४ टन वाळलेले पाचट मिळते त्यापासून दिड टन सेंद्रिय खत तयार होते व जमिनीची सुपिकता वाढते . जमिनीचे तापमान कमी होते पाचट कुजविण्यासाठी एकरी ३२ किलो युरीया, ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व पाचट कुजविणारे जीवाणू ४ किलो वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांची निर्माती करावी असे आवाहन कृषी सेवक अंबादास तेंलग्रे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.