श्रमसंस्कार शिबीरात व्याख्यानमाला व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन
निघोजच्या मुलिकादेवी महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर
निघोज : सत्यशोध न्युज (दि.7 जानेवारी 2025)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.
बुधवारी ( दि. 7) यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. प्रा. संतोष पवार यांनी रस्तासुरक्षा व वाहन चालविण्याचे नियम याबाबत विद्यार्थ्यांना शपथ दिली. विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी. तसेच जागतिक स्तरावर भारतीय अपघातांची संख्या व कारणे यांची माहिती दिली. आपल्या आई-वडिलांचा विचार मनात सतत ठेवावा तसेच वाहनाचा वेग नियंत्रित ठेवून वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रा.पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राध्यापक अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रांमार्फत माणसाच्या जीवनातील संवाद, विसंवाद आणि संवाद कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. मानवाने आपल्या जीवनामध्ये व्यंगचित्रांमार्फत अनेक विसंवाद संवादात परावर्तित करता येतात असे स्वयंसेवकांना सांगितले.
मुलिकादेवी महाविद्यालयातील बहि: शाल शिक्षण मंडळाच्या केंद्र संचालक प्रा संगीता मांडगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ मनोहर एरंडे ,सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गोरक्ष घोलप, प्रा. नम्रता थोरात, प्रा. वृषाली जगदाळे, प्रा. दिपक खामकर, प्रा. प्रवीण सरडे इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचालन आकाश म्हस्के , प्रास्ताविक गायत्री शेंडकर व आभार श्रद्धा गुंड यांनी मानले.