युवकांच्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा शिवाय पर्याय नाही….. प्रा दत्ता कुलट
मुलिकादेवी महाविद्यालय निघोज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
निघोज | सत्यशोध न्युज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर श्री मळाई वडजाई देवस्थान ट्रस्ट चिंचोली या ठिकाणी आयोजित केले आहे.
या श्रमसंस्कार शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रवचनकार शिवव्याख्याते प्रा. दत्ताजी कुलट उपस्थित होते. त्यांनी युवकांचा उद्धार दिनचर्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व व त्यांची गुणवैशिष्ट्य आत्मसात केल्याशिवाय आपला विकास होणार नाही असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनातील समस्यांना कसे सामोरे गेले व अनंत अडचणी असतानाही स्वतःचे अस्तित्व व स्वराज्य कसे निर्माण केले याचे अनेक दाखले स्वयंसेवकांना दिले. त्यातून स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास, श्रमप्रतिष्ठा यासारखे गुण विकसित होण्यासाठी फायद्याचे होणार आहे. त्यांनी आपल्या विचार मंथनातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा जीवन परिचय अनेक प्रसंगातून विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला व तो जिवंत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील रचनशास्त्र प्रमुख प्रा.अशोक कवडे होते. त्यांनी संत आणि थोर व्यक्तिमत्व यांच्या विचारातून व्यक्तिमत्व विकास होतो असे विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर एरंडे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गोरक्ष घोलप, नम्रता थोरात, वृषाली जगदाळे, प्रा सचिन निघुट, प्रा स्वाती पवार आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन स्वराज्य ग्रुपने केले. या कार्यक्रमासाठी पाहुणे परिचय व प्रस्ताविक कुमारी साक्षी भुकन हिने तर सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी कवाद यांनी केले.आभार कुमार यश कदम यांनी मानले.