जांबूत येथे क्रीडा स्पर्धा संपन्न
टाकळी हाजी दि.१७ : ( प्रविण गायकवाड )
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत जांबूत तालुका शिरूर येथे क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला व क्रीडा गुण विकसित व्हावेत तसेच पुढील काळात उकृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी या स्पर्धा घेण्यात येतात असे प्रतिपादन केंद्रप्रमुख महादेव बाजारे यांनी केले.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जांबूत चे सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच राणीताई बोऱ्हाडे ,ग्रा.प.सदस्य पोपट शेठ फिरोदिया माजी सरपंच बाळूशेठ फिरोदिया,व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव जगताप,मुख्याध्यापक सतीश फिरोदिया ,केंद्रप्रमुख महादेव बाजारे,प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश शिंदे, मुख्याध्यापक पी.सी.बारहाते, संपत पोखरकर, सुरेश किऱ्हे, यांचे हस्ते करण्यात आले.तसेच सर्व यशस्वी स्पर्धकांना पोपट शेठ फिरोदिया यांनी बक्षीस देवून विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते संघ पुढीप्रमाणे :
५० मीटर धावणे – लहान गट :
प्रथम क्रमांक – आर्यन बोऱ्हाडे (फाकटे)
मुली- धनश्री रमेश डोंगरे (जांबूत)
उंच उडी – प्रथम : समीर घोलवड, पिंपरखेड
मुली : धनश्री डोंगरे,जांबूत,
लांब उडी – प्रथम : प्रथमेश वाळुंज,
मुली: स्नेहल भाईक ,शरद वाडी,
१००मी.धावणे- मोठा गट: मोहन पंजाबी पिंपरखेड,
मुली: करिश्मा माळी,
गोळा फेक- प्रथम : शिवराज गांगुर्डे,पिंपरखेड.
मुली : करिश्मा माळी,पिंपरखेड,
उंच उडी- मोहन पंजाबी पिंपरखेड
मुली : करिश्मा माळी,पिंपरखेड
लांब उडी – प्रथम पियूष जाधव, काठापूर खुर्द
मुली : करिश्मा माळी , पिंपरखेड
कब्बडी- मुले, मुली प्रथम : पिंपरखेड
भजन प्रथम- पिंपरखेड
लोकनृत्य – लहान गट प्रथम : जांबूत,
मोठा गट- प्रथम : पिंपरखेड
लेझिम- मुले प्रथम : चांडोह
मुली – प्रथम : जांबूत
मोठा गट लेझिम : प्रथम काठापूर खुर्द
.वकृत्व-
लहान गट प्रथम : आराध्या ढगे,पिंपरखेड
मोठा गट प्रथम- श्रेया दाते, काठापूर खुर्द.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य पोपट शेठ फिरोदिया यांनी बक्षीस देवून गौरविण्यात आले.यावेळी पंच म्हणून जांबूत केंद्रातील शिक्षकांनी काम पाहिले.
यापुढील बीट पातळीवरील क्रीडा स्पर्धा दिनांक १८ रोजी जि.प .शाळा पिंपरखेड येथे होणार असून सर्व नियोजन व तयारी झाली असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर व केंद्रप्रमुख महादेव बाजारे तसेच मुख्याध्यापक पी.सी.बारहाते यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू गाजरे व राजेंद्र जोरी यांनी केले.