माळवाडी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात संपन्न

0

टाकळी हाजी |

माळवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये रविवारी (२६ जानेवारी) वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेसाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले कलामंच, ध्वजस्तंभ, बोअरवेल आदीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

माळवाडी येथील ग्रामस्थ शिक्षणाप्रती जागरूक असल्याचे यावेळी दिसून आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच शाळेच्या आवश्यक गरजा ओळखून प्रगतशील शेतकरी स्व.पांडुरंग राणोजी रसाळ यांच्या स्मरणार्थ उद्योजक जनार्दन पांडुरंग रसाळ यांनी शाळेसाठी कलामंच बांधून दिला असून प्रगतशिल शेतकरी बाबुराव तुकाराम भाकरे यांचे स्मरणार्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल दिगंबर भाकरे यांनी ध्वजस्तंभ , संतोष कानडे यांनी लेक्चर स्टँड तसेच माळवाडी ग्रामपंचायत कडून फिल्टर रूम, बोअरवेल व कचराकुंडी उपलब्ध करून देण्यात आली.तसेच माळवाडीचे प्रथम सरपंच सोमनाथ भाकरे यांना दोन वेळा एक्सलेंट सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या आणि शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कलेमधून समाजप्रबोधन केल्याने टाळ्या आणि बक्षिसांच्या वर्षावाने ग्रामस्थांनी दाद दिली. यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगाचे तज्ज्ञ संचालक सोपानराव भाकरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे , उपसरपंच साधना गारुडकर ,सोसायटीचे चेअरमन परशुराम भाकरे,माजी उपसरपंच मच्छिंद्र भाकरे, नवनाथ रसाळ,आनंदा भाकरे, आदिनाथ भाकरे,ग्रामपंचायत सदस्य निलम रसाळ, पूजा पांढरकर , सारिका भाकरे, ग्रामपंचायत अधिकारी राणी साबळे, उद्योजक जनार्धन रसाळ, माजी उपसरपंच मच्छिंद्र भाकरे, नवनाथ रसाळ, सुरेश भाकरे, मानवाधिकार संघटनेचे बाबाजी रासकर, विलास भाकरे, निलेश भाकरे, दत्तात्रय पांढरकर, गणेश भाकरे , मुख्याध्यापक राजेंद्र चोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल भाकरे, उपाध्यक्ष प्रकाश भाकरे, सदस्य , उपशिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम व्यवस्थापन सुमन पठारे, सविता बनकर, सूत्रसंचालन पांडुरंग निचित, विजया ताठे यांनी तर आभार अरुण खोमणे या शिक्षकांनी मानले. शाळा व्यवस्थापन समिती कडून विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.