आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनला सेवा सन्मान पुरस्कार
कराड येथील जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान
शिरूर | कराड येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.यावर्षी शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेस “जनकल्याण सेवा सन्मान”हा पुरस्कार जाहीर झाला होता.हा पुरस्कार सोहळा नुकताच कराड येथे पार पडला.यावेळी सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक संजय सुड्रिक व चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आले.
आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या संस्थापिका ॲड.राणीताई चोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.२५ हजार रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी व सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे,उपाध्यक्ष डॉ.मिलिंद पेंढारकर,मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके आदी उपस्थित होते.
शिरूर येथे आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही गेल्या आठ वर्षांपासून विशेष मतिमंद मुलांसाठी कार्यरत असून मुलांना दैनंदिन, शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्य शिकवून सक्षम बनविणे,मुलांचे खुशी निवासी केंद्र मध्ये संगोपन व सांभाळ केला जातो,तसेच वैवाहिक, कौटुंबिक समुपदेशन करणे यासाठी संस्था कार्य करत आहे.