मलठण ग्रामीण रुग्णालयास अँब्युलन्स आणि वैद्यकीय उपकरणांची भेट
झूमलिऑन कंपनीचा सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रम
टाकळी हाजी |(साहेबराव लोखंडे )
शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयासाठी झूमलिऑन कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत अँब्युलन्स आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची भेट देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत अँब्युलन्ससह बेड, व्हीलचेअर, ड्रेसिंग स्टँड, स्ट्रेचर, फ्रीजर, बेबी वॉर्मर आदी उपकरणांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व दुर्गम भागांतील आरोग्यसेवा सक्षम करणे आणि आपत्कालीन प्रसंगी वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हा आहे.
लोकार्पण सोहळ्याचे आयोजन नुकतेच मलठण येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी थोरात होत्या. झूमलिऑन कंपनीचे प्रतिनिधी मिलिंद रसाळ , व्हॉईस संस्थेचे प्रितेश आंभोरे, उन्नती बालग्रामचे हितेश वधवानी आणि वैभव पोरे यांनी उपक्रमात मोलाचे योगदान दिले. मिलिंद रसाळ यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि ही सुविधा भविष्यात मलठण व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, दंडवते भाऊसाहेब, उपसरपंच किरण शिंदे, माजी उपसरपंच रामचंद्र गायकवाड, दादा गावडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना फुलसुंदर, सुरेश गायकवाड, सुरज सावंत, राजकुमार राऊत, ऋषिकेश शिळीमकर, शरद गिते, शिरीष गिते, आसवले, योगेश कदम, सुदाम गायकवाड, संदीप गायकवाड, प्रमोद दंडवते, डॉ. मुळे, संतोष गायकवाड, ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, अंगणवाडी सेविका, रुग्णालय कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन अविनाश गायकवाड आणि मुकुंद नरवडे यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच विलास थोरात यांनी केले. डॉ. नागरे यांनी झूमलिऑन आणि सहकारी संस्थांचे आभार मानत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, तसेच रुग्णालयात डोळ्यांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त केली.