टाकळी हाजी |
टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील निरंजन कल्पना भानुदास गावडे इयत्ता पहिली या विद्यार्थ्याने वडझिरे इंग्लिश मिडीयम शाळेत आयोजित केलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १२७ गुण मिळवून राज्यात १३ वा क्रमांक मिळविला असून जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळविला आहे, वडझिरे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग लंके सर वर्गशिक्षिका माधुरी कोरडे मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले.त्याच्या यशाबद्दल परिसरातील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.नुकत्यात झालेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळविल्याबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,
त्याच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटरावजी गावडे ,सरपंच अरुणाताई घोडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन सोनभाऊ मुसळे,पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे,बैलगाडामालक हरिदास गावडे,कोहिनूर उद्योग समूहाचे स्वप्निल गावडे,प्रगतशील बागायतदार सोमनाथ गावडे, बापुसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक विजय थोरात, पत्रकार साहेबराव लोखंडे यांनी अभिनंदन केले.