फसवणुकीपासून सावध! शिरूर पोलिसांचा नागरिकांना आर्थिक सुरक्षा इशारा

प्रलोभनांना बळी पडू नका

0

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)

विविध आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी शिरूर पोलीस ठाणे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मागील काही काळात गुंतवणुकीच्या माध्यमातून अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून नागरिकांना सतर्क करत खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 महत्त्वाचे इशारे व सूचना:

अनोळखी व्यक्तींवर विश्वास नको
बाहेरून आलेल्या व्यक्तींशी नवीन ओळख झाली म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नका.
प्रलोभनांना बळी पडू नका
कुठल्याही संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या आकर्षक प्रलोभनांना बळी पडून पैसे गुंतवू नका.
शेअर मार्केटमध्ये फक्त माहिती असलेल्या व्यक्तींनी गुंतवणूक करावी
कोणीतरी सांगितले म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका, आधी पूर्ण माहिती घ्या.
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक टाळा
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना भारत सरकार व रिझर्व्ह बँक यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करा.
उच्च व्याजाचे आमिष – धोका असतो!
आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्या काही काळ व्याज देऊन नंतर पळून जातात.
चेन मार्केटिंगपासून सावध
“तुम्ही आणखी लोकांना जोडाल, तर कमिशन मिळेल” अशा स्कीम्सपासून दूर राहा.
कंपनीची पार्श्वभूमी तपासा
कंपनी रजिस्टर आहे का, गुंतवणूक स्वीकारण्याचा परवाना आहे का – याची खात्री करा.
खूप जास्त परतावा = फसवणुकीची शक्यता
जेवढा जास्त परतावा सांगतात, तेवढाच धोका मोठा असतो.
पतसंस्था, बँकांची खातरजमा करा
गुंतवणुकीपूर्वी संस्थेचे ऑडिट रिपोर्ट, वर्ग तपासूनच गुंतवणूक करा.
बँक खाते इतरांना वापरण्यास देऊ नका
कोणालाही बँक खाते वापरू देऊ नका, फसवणुकीस बळी पडू शकता.
फक्त अधिकृत संस्थांमध्येच गुंतवणूक करा
राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट, सेबी व RBI मान्यताप्राप्त संस्थांमध्येच गुंतवणूक करावी.
भिसी स्कीमपासून दूर रहा
भिसी, बाँस भिसी या स्कीम अधिकृत नसून, फसवणुकीचे प्रकार त्यात घडले आहेत.
वैयक्तिक माहिती फोनवर देऊ नका
OTP, आधार, पॅन नंबर फोनवर कोणी मागितले तरी देऊ नका.
जमिनीच्या व्यवहारात दक्षता आवश्यक
जमीन खरेदी करताना विक्रेता खरा मालक आहे की नाही, याची खात्री करूनच व्यवहार करा.
पेमेंट व्यवहार RTGS / चेक द्वारेच करा
रोख व्यवहार टाळा, अधिकृत मार्गानेच व्यवहार करा.
लेखी कराराशिवाय व्यवहार नको
कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण लेखी कराराशिवाय करू नका.
खोटी नोकरीचे आमिष – पोलिसांना कळवा
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी.
जमिनीचे सर्च रिपोर्ट अनिवार्य
गुंतवणुकीपूर्वी वकीलामार्फत जमिनीचा सर्च रिपोर्ट काढा.
बेकायदेशीर प्लॉटिंगपासून सावध रहा
जमिनीची खरेदी करताना ती जमीन कलेक्टर एन.ए. आहे का, याची खात्री करा.

नागरिकांनी सतर्क राहून या सर्व सूचनांचे पालन करावे, कोणतीही शंका असल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. फसवणुकीपासून बचाव हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच शक्य आहे.
–  संदेश केंजळे , पोलीस निरीक्षक शिरूर

Leave A Reply

Your email address will not be published.