विद्याधन कोचिंग क्लासेसचा शिवजयंती उत्सव आदर्श उपक्रम — डाॕ.विक्रम वराळ
संकटाशी लढण्याची ताकद मिळवयाची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावाच लागेल... प्रा. ज्ञानेश्वर कवाद
सत्यशोध : निघोज प्रतिनिधी
अ.नगर जिल्ह्यातील निघोज (ता.पारनेर) येथे शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर संचलित विद्याधन कोचिंग क्लासेसमध्ये भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. क्लासचा एक आदर्श उपक्रम पाहावयास मिळत आहे ,असे प्रतिपादन डाॕ.विक्रम वराळ यांनी केले. तसेच विद्याधन कोचिंग क्लासचे विद्यार्थी शिवरायांचे विचार आपल्या जीवनात नक्कीच आत्मसात करून आचरणात आणतील असा आशावाद डॉ. वराळ यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निघोज गावचे मा.पोलिस पाटील पांडुरंग पाटील लंके हे होते.यावेळी विद्याधन कोचिंग क्लासेसमधील ४० विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले विचार मनोगतातुन व्यक्त केले. उपस्थितीत बाल व्याख्यातांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर यावेळी म्हणाले , जीवनात तुम्हांला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद मिळवयाची असेल तर तुम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावाच लागेल. विद्यार्थ्यांनी जीवनात आपले ध्येय निश्चित करुन अहोरात्र कष्ट करुन आई वडिलांचे स्वप्न पुर्ण केले पाहिजे.आई वडिलांची मान समाजात ताठ ठेवायाची असेल तर तुम्हांला संस्कार , अभ्यास आणि संगत या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते पारनेर तालुका पत्रकार संघ व राज्य मराठी राज्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ताजी उनवणे ,संदिपपाटील वराळ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिनपाटील वराळ , प्राचार्य शिवाजी शेटे , डाॕ.विक्रम वराळ , बचत गटाच्या महिला समन्वयक सुधामती कवाद , मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद , पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लंके , उपसरपंच माऊली वरखडे , निघोज तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे , ग्रामपंचायत सदस्य भास्कर वराळ ,अॕड गणेश लाळगे , कलाशिक्षक प्रा.ज्ञानेश्वर कवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठकाराम गायखे, दिलीपराव ढवण , भिमराव लामखडे , आप्पासाहेब वराळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अॕड.गणेश लाळगे ,अॕड.सोमनाथ गोपाळे , पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे ,प्राचार्य रामचंद्र सुपेकर ,सलीम हवालदार , सचिन जाधव ,सागर आतकर ,संपत वैरागर ,युवा उदयोजक मोहनराव कवाद , सुहास लंके ,दिपक लंके ,मयुर पठारे ,पत्रकार भास्कर कवाद सर ,प्रा.मंदा जाधव , प्रा.अपेक्षा लामखडे ,सुभाष आतकर , विकास लंके ,महेश रोकडे , पृथ्वी कोल्हे ,दादाभाऊ रसाळ ,सचिन नर्हे ,राजाराम ढवळे ,यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.भरत डोके सर यांनी तर सुत्रसंचालन वैष्णवी कवडे व श्रावणी घोगरे यांनी केले. आभार अॕड.तेजस कवाद यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करुन उच्च शिक्षण घेवुन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करत असताना सामाजिक बांधलिकीही जपावी यासाठी आमचा प्रयत्न.
…शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशालचे वक्ते )