टेमकरवस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी
टेमकरवस्ती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , विद्यार्थी , नवदुर्ग महिला गट आणि ग्रामस्थ यांचा सहभाग
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील टेमकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी विद्यार्थी आणि शिक्षक तसेच नवदुर्ग महिला गटाच्या महिला व ग्रामस्थांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. जिल्हा परिषदेच्या टेमकरवस्ती शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका आणि महिलांनी पारंपारिक वेशभूषा करत एकत्र येऊन प्रतिमा पूजन, आरती, पाळणे म्हणून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगातील आदर्शांचेही आदर्श. त्यांचे नाव उच्चारताच स्फुरण चढते. भारतीय संस्कृती टिकविण्याबरोबरच हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी राजांनी केलेला संघर्ष रोमांचीत करणारा असल्याचे मुख्याध्यापक विकास उचाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महिलांनीही आपले विचार मांडले. आम्ही सर्व महिला शिवरायांचे विचार आत्मसात करून आचरणात आणू, जीवनात प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद मिळवयाची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देईल असे येथील शेतकरी महिला सुनिता करकंडे यांनी विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी जीवनात आपले ध्येय निश्चित करुन अहोरात्र कष्ट करुन आई वडिलांचे स्वप्न पुर्ण केले पाहिजे.आई वडिलांची मान समाजात ताठ ठेवायाची असेल तर संस्कार , अभ्यास आणि संगत या गोष्टींकडे समाजाबरोबरच विद्यार्थी आणि पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. असे मनोगत येथील सामाजिक कार्यकर्त्या मंगल लोखंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,अंगणवाडी सेविका ग्रामस्थ व नवदुर्ग महिला गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाराजांचा जयजयकार म्हणजे त्यांचा अतुलनीय पराक्रम,जिद्द, राजकारण,धर्मप्रेम, देशप्रेम, मुत्सदेगीरी,लोकोपयोगी उपक्रम अशा अनेक गुणांचे स्मरण. शुन्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे नेमके काय, पराक्रम म्हणजे काय, रामराज्य म्हणजे काय याची उत्तरं छत्रपतींच्या चरित्रात मिळतात….
अरुणा दामुशेठ घोडे,सरपंच टाकळी हाजी