समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे सन्मान व्हायला हवेत. …… शिवव्याख्याते श्री.नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन.
जिल्ह्यातील सर्वात मोठा शिष्यवृत्ती सन्मान सोहळा संपन्न.
टाकळी हाजी : प्रतिनिधी
समाज घडविणाऱ्या गुरुजनांचे सन्मान समाजात सर्वात आधी व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते श्री .नितीन बानगुडे पाटील यांनी केले.लोकसेवा प्रतिष्ठान, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव तालुका हवेली आणि पुणे जिल्हा पदवीधर,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी व ८ वीचे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थी यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षी पाच पेक्षा अधिक मुले शिष्यवृत्तीत आणणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होतो. परंतु इतर शिक्षक सन्मानाविना राहून जातात. त्यांचेही कष्ट मोलाचे आहेत.शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक दररोज विद्यार्थ्यांचे ज्यादा तास घेतात. वर्षभर सुट्ट्या न घेता, इतर कार्यक्रमांना उपस्थित न राहता मुलांना वेळ देऊन त्यांचा सराव करून घेतात. जिल्ह्यातील अशा सर्व गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्याचा सन्मान व्हावा आणि इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी, म्हणून सदर सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गुणवत्ता यादीतील ८०० विद्यार्थी व सुमारे २०० शिक्षकांसह राज्य गुणवत्ता यादीत आलेले ३५ विद्यार्थी, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, श्री.शिवराम मुंजावडे सर,आर.बी. गुजर हायस्कूलचे लिपिक योगेश चव्हाण सर , कैलास पाचर्णे सर यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पातळीवरील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गुणगौरवाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे अनिल पलांडे यांनी सांगितले.
आपल्या व्याख्यानाने नितीन बानगुडे पाटलांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. यशस्वी व्हायच असेल तर कष्ट केले पाहिजेत आणि त्याची सुरुवात लवकर व्हावी. मुलांसाठी कष्ट घेऊन उत्तम पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा समाजात गौरव झाला तर चांगले काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.
गुणगौरव उपक्रमाबद्दल लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दीपक पायगुडे आणि पदवीधर शिक्षक संघटनेचे श्री बानगुडे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमास लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, पदवीधर संघटनेचे माजी राज्याध्यक्ष सावंत सर, सरचिटणीस अनिल पलांडे, जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे,जिल्हाध्यक्षा सुप्रिया नवले कार्याध्यक्ष शहाजी पवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नरवडे, सरचिटणीस आप्पा जगदाळे महिला अध्यक्षा सविता भोगावडे, चेअरमन नंदकिशोर पडवळ, माजी चेअरमन सौ. वंदना पाचर्णे, संध्या धुमाळ , सोसायटी संचालक रामचंद्र नवले,संतोष विधाटे , चंद्रकांत खैरे अंजली शिंदे मानसी थोरात तसेच उमेश धुमाळ,प्रदीप गव्हाणे,पोपट गांधले यांच्यासह स्वाती शिरसाठ शोभा तिकांडे वैशाली तांबोळी व संघटनेचे अनेक कार्यकर्ते, जिल्ह्यातील अनेक शिक्षक ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पलांडे यांनी केले . सूत्रसंचालन पांडुरंग जगताप आणि आभार प्राचार्य नरहरी पाटील यांनी मानले.
उत्तम