मलठण येथे गळफास घेवून १९ वर्षाच्या युवकाची आत्महत्या

0

मलठण |

मलठण (ता.शिरुर) येथील एका युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. तन्मय रामदास कदम ( वय -१९ वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम ( वय ४२ वर्षे ) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलीस स्टेशनला दिली आहे. रविवारी (दि.२) रात्री सव्वाबाराचा दरम्यान तन्मय हा गावातील वरातीला जावून घरी झोपण्यासाठी आला व शेजारील खोलीमध्ये दार लावून झोपला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रामदास कदम यांनी मुलगा तन्मय याला तो झोपलेल्या खोलीचा दरवाज्या वाजवून गोठ्यातील फॅन चालू कर म्हणून आवाज दिला होता परंतू त्यांने काही प्रतिसाद दिला नाही.

तन्मयचा भाऊ ऋषभ दुपारी जनावरांना खादय आणण्यासाठी निघाला. त्यावेळी गाडीची चावी घेण्यासाठी तन्मय झोपला होता त्या खोलीचा दरवाजा वाजवला, तन्मयने खोलीचा दरवाजा उघडला नाही .म्हणून ऋषभने खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता तन्मयने खोलीचे लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी ऋषभने वडिल रामदास यांना आवाज दिला, व त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत गेले. तन्मय ला खाली घेऊन हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भागवत गरकळ करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.