आबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

शिवबा संघटनेची विधान भवनावर निदर्शने

0

टाकळी हाजी |

अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची व आमदार महेश लांडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची प्रमुख मागणी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. अहिल्यानगर व पुणे कार्यरत शिवबा संघटनेच्या वतीने मुंबई येथे विधान भवन समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आले.

काही दिवसापूर्वी आबू आझमी यांनी औरंगजेबचे उदात्तीकरण करून महाराष्ट्रातील शिवशंभूभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या,त्याचे विधानसभेतही तीव्र पडसाद उमटले. आमदार महेश दादा लांडगे यांनी अतिशय आक्रमकपणे आबू आझमी यांचा विरोध केला. शिवबा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. विधान भवनासमोर आबू आझमी विरोधी फलक झळकवले व जोरदार घोषणाबाजीने विधान भवन परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, पुणे जिल्हाध्यक्ष माऊली घोडे, शिरूर तालुका प्रमुख सोमनाथ भाकरे , शिवबा दुर्ग संवर्धन प्रमुख राजूभाऊ लाळगे, शिरूर तालुका उपाध्यक्ष ओंकार जाधव, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख नवनाथ बरशिले, नाथग्रुप अध्यक्ष कृष्णा मैड , युवक तालुकाप्रमुख केशवजी शिंदे, दत्ता टोणगे , शांताराम पाडळे, हरीश मधगे, निलेश वरखडे,योगेश भाकरे ,रोहित कदम ,राहुल गारुडकर,धनंजय पांढरकर, प्रशांत घोडे, महेश साळुंके, कृष्णा तौर, शशिकांत काळे, शिवाजी साळुंके आदी शिवबा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवबा संघटना छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारी एक संघटना आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन समाजामध्ये चांगलं काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.