विधानसभा प्रचारासाठी गायब खासदार पुन्हा अवतरणार

0

टाकळी हाजी :  (साहेबराव लोखंडे)

 

लोकसभा निवडणुकीनंतर शिरूर भागात कधीही न दिसलेले शिरूर लोकसभेचे लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा मतदार संघात अवतरणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ नव्हता मात्र आता विधानसभा प्रचारासाठी आपल्या भाषणातून लोकांना प्रभावित करण्याचा जोरदार प्रयत्न त्यांच्याकडून होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकावयास मिळत आहे.

 

पवार साहेबांची निष्ठा आणि विरोधी पक्षावर टिका हे भांडवल वापरले जाणार यात शंका नाही. शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत लोकांना भावनिक बनविण्यात कुठलीही कसर ठेवली जाणार नाही. या खासदारांनी आधी स्वतःचे व्हिजन जाहिर करावे अशी कुजबुज ऐकावयास मिळत आहे.

 

मतदासंघातील नागरीकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय उघडले जाईल. कोणत्याही कामासाठी फोन करा…खासदार सदैव उपलब्ध असेल…अशी अनेक आश्वासने निवडणूक काळात दिली गेली मात्र या सगळ्याला केराची टोपली दाखविली गेली. कामानिमित्त कधी फोन केला तर साहेब उचलत नाहीत आणि त्यांचे पी ए फोन उचलला तर छान छान बोलतात आणि नंतर फोन उचलणे बंद करतात याचा प्रत्यय अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी नाराजीची प्रचंड मोठी लाट मतदार संघात असल्याचे दिसून येत आहे.

 

शरद पवार यांच्या वरील निष्ठा एवढा एकमेव मुद्दा उचलून धरत लोकसभा जिंकली पण यावेळी हुंकार निष्ठेचा हा मुद्दा किती मतदारांना भावतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.