माळवाडी च्या उपसरपंच पदी साधना गारूडकर

1

टाकळी हाजी |
माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आदिनाथ शिवाजी भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी गुरूवारी (दि.२६) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी साधना राहुल गारूडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंच सोमनाथ भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेविका राणी साबळे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले. सामाजिक , राजकीय क्षेत्रातील कामाची आवड आणि त्यांचे योगदान यामुळे गारुडकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर गावडे , टाकळी हाजीच्या सरपंच अरुणा घोडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, घोडगंगाचे तज्ज्ञ संचालक सोपानराव भाकरे , राजेंद्र गावडे ,माळवाडी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन परशुराम भाकरे, टाकळी हाजीचे माजी उपसरपंच नवनाथ रसाळ, मच्छिंद्र भाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास भाकरे , उपाध्यक्ष सुर्यकांत भाकरे, उद्योजक जनार्दन रसाळ,अविनाश भाकरे, रामदास भाकरे, भगवान पांढरकर , बापुसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक बाबाजी रासकर, दिलीप उचाळे, माजी उपसरपंच आनंदा भाकरे, आदिनाथ भाकरे, ग्रामपंचायत सदस्य निलम रसाळ, पूजा पांढरकर, सुनिता भाकरे, शिवबा संघटनेचे डॉ.दौलत पांढरकर , रावसाहेब भाकरे, कैलास भाकरे,तुषार भाकरे, संतोष भाकरे,विलास भाकरे, भिमदास भाकरे, लहू भाकरे,अनिल रसाळ , अनिल गारूडकर ,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भाकरे यांनी केले.

1 Comment
  1. xibZUzKVKbcUh says
Leave A Reply

Your email address will not be published.