सामाजिक समतोल राखण्यासाठी शरद पवारांकडून दामू आण्णांना बळ…

अब की बार ..घोडे आमदार ... राजकिय चर्चेला उधाण

3

टाकळी हाजी | 

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. काल पर्यंत शरद पवार म्हणजे आमचे पांडुरंग असे म्हणणारे पुणे जिल्हातील जवळजवळ सगळेच दिग्गज धाकट्या पवारांच्या कळपात सामील झाले ! जिल्हाच्या राजकारणावर मराठा समाजाचे प्राबल्य असले तरी सामाजिक समतोल साधण्यासाठी शरद पवारांनी कायम शिरुर असो कि इंदापुर या जागेवर धनगर चेहरा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

इंदापुरचे आमदार दत्तामामा भरणे आणि शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे हे दोन मोठे नेतेही अजितदादा यांच्या बरोबर गेले. शरद पवारांच्या पुरोगामी भुमिकेमुळे या नेत्यांना पाठबळ मिळाले हे कुणीही नाकारु शकत नाही.

आजच्या घडीला शिरुर – आंबेगाव मतदार संघात एकेकाळी शरद पवारांचे मानसपुञ अशी ओळख असलेले राज्याचे जेष्ठ नेते सहकार मंञी दिलीपराव वळसे पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे ही मातब्बर मंडळी विकासाच्या मुद्द्यावर आणि डिंब्याचे पाणी प्रश्नावरून अजित पवारांच्या विचारांसोबत आहेत.

 इंदापुर मध्ये हर्षवर्धन पाटील किंवा प्रविण माने हेच तुतारीचे उमेदवार असण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या खालोखाल राजकीय ताकद असणाऱ्या माळी व धनगर मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवारांना शिरुर – आंबेगाव किंवा हडपसर या दोन्ही जागेवरच मराठेतर उमेदवार देण्यासारखी परिस्थिती झाल्याचे राजकिय जाणकारांचे मत आहे.

शिरूर – आंबेगाव मतदासंघांत शरद पवार यांच्या बरोबर असलेला धनगर समाजाचा नेता म्हणून टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांना दस्तुरखुद्द शरद पवार यांनी बारामतीला बोलावून राजकीय आराखडे जुळविले आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांना जिल्हा परिषद गटातून दिलेली मतांची आघाडी पाहून शरद पवार पक्षाच्या नेत्यांच्या नजरेत दामुशेठ घोडे यांची लोकप्रियता वाढलेली दिसून येते . शिरुर तालुक्यातील 42 गांवामध्ये घोडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर शरद पवारांनी पूञवत प्रेम करुनही अडचणीच्या काळात वळसे पाटलांनी साथ सोडल्याने आंबेगाव मध्ये त्यांच्या बद्दल नाराजी पहावयास मिळत आहे.

प्रचंड लोकप्रियता असतानाही एकञित राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गत कुरघोडींमुळे सतत डावलले जात असतानाही अडचणीच्या काळात शरद पवारांवर श्रध्दा ठेवून दामूशेठ घोडे हे ठाम राहिले आणि हीच त्यांची भुमिका जनतेला भावली आहे…वेगवेगळ्या सर्वेक्षणा मधून शिरुर – आंबेगाव मधून दामूशेठे घोडे यांचे नाव आघाडीवर येत असल्याने शरद पवार राजकीय धक्कातंञाचा वापर करुन जनतेच्या प्रेमावर स्वार झालेल्या दामूआण्णा घोडे नावाचे अस्ञ वापरतात का याची उत्सुकता वाढीस लागली आहे.

क्रमशः

3 Comments
  1. sBduejxoWDJXOq says
  2. KhGARYUgvihVeWe says
  3. YXbIUpFjcGJWs says
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.