पंचवीस वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळा

0

टाकळी हाजी : प्रतिनिधी


             टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील बापूसाहेब गावडे विदयालयातील इ. १० वी सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १४) संपन्न झाला. तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व मित्र- मैत्रिणी यांनी मिळून स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्यामध्ये प्रामुख्याने बाबाजी साबळे, सचिन विश्वासे,शहाजी पवार, कुंडलिक उचाळे, ज्ञानेश्वर घोडे, कचरू शिंदे, मच्छिंद्र घोडे, संभाजी उचाळे, दत्ता भाकरे, संतोष कानडे, संतोष खाडे, सुधीर साळवे, सुनील देशमुख, बाबाजी घोडे, युनुस पठाण, सचिन सोनवणे, अर्जुन नायकोडी, संपत भाकरे, अविनाश गायकवाड, शिवाजी होणे, संपत ढवळे, संदीप ढमढेरे, संदीप निकम, शांताराम खामकर, शिवा मेचे राजू उचाळे, तसेच विद्या भाकरे, कालिका भाकरे, शिल्पा हिलाळ, विद्या लोंढे, मंदा ढवळे, शकुंतला गारुडकर, संगीता शेटे, सुमन खाडे या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सर्वांनी मनोगतात आपापली मते व्यक्त केली. सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक कुंडलिक उचाळे यांनी व आभार शहाजी पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.