हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
टाकळी हाजी ( दि. १०)
कवठे येमाई ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी रमेश विठ्ठल गावडे यांचा सतरा वर्षाचा एकुलता एक मुलगा कृष्णा हा हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याची नारायना हॉस्पीटल बेंगलोर येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी सहा लाख रुपये खर्च आहे.
सदर रुग्नाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे.ते स्वतः मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या मुत्रपिंडाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
मुलासाठी दवाखान्याचा सहा लाख रुपये खर्च त्यांना न पेलवणारा आहे. कवठे येमाई चे सामाजिक कार्यकर्ते सोपान वागदरे, नवनाथ इचके यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत मदत करण्याचे आवाहन केले आहे.
रमेश विठ्ठल गावडे
मदतनिधीसाठी फोन पे नं – 8805734161
बँक तपशिल: कॅनरा बँक, शाखा- कवठे येमाई
Account no. 53302200021417
IFSC Code : CNRB0015330