पखाले परिवाराच्या ‘श्री गणेशा कृषी उद्योग’ चे शिनगरवाडीत उद्घाटन…
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मधील शिनगरवाडी येथे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पखाले,सामाजिक कार्यकर्ते गोरख पखाले या बंधूंनी शेतकऱ्यांची गरज ओळखून भव्य असे खते – औषधांचे ‘श्री गणेशा कृषी उद्योग’ दुकान थाटले असून उद्घाटन शुक्रवारी दि २ डिसेंबर रोजी माजी आमदार पोपटराव गावडे,सरपंच अरुणाताई घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. व्यवसायाचा श्री गणेशा ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाच्या संगीत भजनाने झाला.
पखाले परिवार राजकीय, धार्मिक,उद्योग ,व्यवसाय, शिक्षण,कृषी यामध्ये उत्तम ज्ञान असलेला परिवार असल्याने त्यांचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क याच्या जोरावर त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होईल , असे अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितले. त्यांचे यापूर्वी किराणा, ट्रान्सपोर्ट, हार्डवेअर असे व्यवसाय सुरू आहेत.
यावेळी निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे,पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष सावित्रा थोरात,पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती , ओ बी सी सेल नगर चे अध्यक्ष खंडू भुकन, माजी सभापती किसन रासकर, चेअरमन बन्सी घोडे, निघोज नागरी पतसंस्थेचे संचालक भिवा रसाळ, कवठे येमाई चे माजी सरपंच बबन पोकळे, माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे,माजी सैनिक बाबाजी खामकर, आर बी गावडे सर, दशरथ खामकर,रामदास रसाळ, दिलीप ढवण, नवनाथ रसाळ,बबन किऱ्हे, पोपट घोडे,रोहिदास घोडे, प्रगतशील शेतकरी डाळींब रत्न रवि भाकरे,उद्योजक दिलीप सोदक, सखाराम खामकर, उज्जैन खामकर, गोरख घोडे, गोरख औटी,शहाजी साळवे, बाबू चोरे, बाबाजी हिलाळ,नारायण कांदळकर, भाऊसाहेब महाराज चोरे,सुभाष महाराज गावडे,माजी उपसरपंच मच्छिंद्र भाकरे,देविदास भाकरे,बबन मुसळे,अशोक गावडे, लक्ष्मण सिनलकर, म्हतारबा बारहाते गुरुजी, सोनभाऊ कांदळकर, भाऊसाहेब घोडे, अंकुश उचाळे, पोपट उचाळे,कैलास गावडे,दत्तात्रय कांदळकर, नाना ढोबळे, संतोष गावडे,योगेश हिलाळ, संजय खटाटे,बाळासाहेब खटाटे, मानवाधिकार चे शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, माळवाडी चे उप सरपंच आनंदा भाकरे, चंद्रकांत लंके, रावसाहेब रसाळ,योगेश भाकरे,संतोष भाकरे,आदिनाथ भाकरे,मंगेश खोमणे, महादू लामखडे, बाळासाहेब जाधव, पत्रकार योगेश भाकरे, तसेच शिरूर, आंबेगाव, पारनेर,श्रीगोंदा तालुक्यातील मान्यवर तसेच पखाले परिवाराचे नातेवाईक,मित्र परिवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम खामकर ,सूत्र संचालन इंदर खामकर यांनी तर आभार बाळासाहेब पखाले यांनी मानले.