मलठण सोसायटीच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र गायकवाड

0

टाकळी हाजी |

मलठण (ता.शिरूर) येथील मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र उर्फ योगेश सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. अलका कोठावळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मंगळवारी (दि.१८) संस्थेच्या कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच. धायगुडे यांनी जाहीर केले.

यावेळी माजी सरपंच शशिकांत वाव्हळ, शशिकला फुलसुंदर, सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना फुलसुंदर, दत्तात्रय गायकवाड, सुरेश गायकवाड, सुदाम गायकवाड, माजी उपसरपंच रामभाऊ गायकवाड, उदयोजक सागर दंडवते, गणेश जामदार , सोसायटीचे उपाध्यक्ष साळभाऊ शिंदे, संचालक सुभाष दंडवते, महादू गायकवाड, सुभाष सोनवणे, शरद दंडवते, बिरा शिंदे आदी उपस्थित होते.

शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, घोडगंगाचे संचालक सुहास थोरात, प्रा.अनिल शिंदे , सामाजिक कार्यकर्ते मंगेश दंडवते यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.