पाणीप्रश्नी वळसेपाटील यांची जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा
६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय
प्रफुल्ल बोंबे | पिंपरखेड
आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांतील ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाणी उपलब्धतेविषयात महत्त्वपूर्ण बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला आंबेगाव ~ शिरूरचे लोकप्रतिनिधी दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या तालुक्यांतील ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी सकारात्मक निर्णय घेताना तिन्ही तालुक्यांतील बंधाऱ्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतला. यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पाण्याचा लाभ मिळेल, शेती सुजलाम-सुफलाम होईल आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, हा विश्वास आहे.