युवाशक्ती दुध संस्थेकडून सभासदांना बोनस वाटप
पिंपरखेड प्रतिनिधी (दि.२७ )
शिरूरच्या बेट भागातील विविध सहकारी संस्थाकडून सभासद, दुग्ध व्यवसायिकांना लाभांश आणि बोनसचे वाटप करण्यात आले. पिंपरखेड (ता.शिरूर) येथे युवाशक्ती दुग्ध संस्थेच्या माध्यमातून दुध उत्पादकांना प्रति लिटर एक रुपया याप्रमाणे बोनस तर महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
दुध उत्पादनामध्ये महिलांचे काम मोठे असून चारा काढण्यापासून तर दुध केंद्रावर दुध नेईपर्यंत महिलांचे योगदान असल्याने विविध दुग्ध संस्थांच्या संचालक मंडळात महिलांना स्थान दिले तर तिथेही त्या उत्तमप्रकारे काम करून संस्था नफ्यात आणतील असा विश्वास यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी दुग्ध उत्पादकांना बोनस तर महिलांना साडी आणि मिठाई वाटप करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, दत्ता खळदकर, माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, उपसरपंच विकास वरे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, रामदास ढोमे, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, निवृत्ती बोंबे, रामदास दरेकर, दुग्ध संस्थेचे अध्यक्ष बाळशिराम ढोमे यांचेसह सर्व संचालक, दुध उत्पादक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश ढोमे यांनी केले. आभार विपुल ढोमे यांनी मानले.