शरदवाडी चषक 2024 : गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर प्रथम
जांबुत | दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान व डॉक्टर सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शरदवाडी (ता. शिरूर) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर या संघाने प्रथम क्रमांक पटकविला. द्वितीय क्रमांक सागरआप्पा किंग एलेव्हन मलठण, तृतीय क्रमांक कवठे येमाई संघ व चतुर्थ क्रमांक तुकाई देवी फायटर पिंपरखेड. या सर्व विजयी संघांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विजयी संघांस प्रथम क्रमांकासाठी रुपये 41 हजार ( देवदत्त निकम व दामू अण्णा घोडे ) , द्वितीय क्रमांकासाठी रुपये 31 हजार (डॉ .सुभाषराव पोकळे), तृतीय क्रमांकासाठी रुपये 21 हजार (प्रभाकर गावडे राहुल शेठ जगताप व डॉक्टर दत्तात्रय डुकरे) व चतुर्थ क्रमांकासाठी रुपये 11 हजार (सागरआप्पा दंडवते व सागरशेठ दांगट) असे लाखो रुपयांचे बक्षिसे असल्याने अनेक संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
सोमवारी ( दि. 29) मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बन्सीशेठ घोडे, शिरूर पंचायत समिती सदस्य व टाकळी हाजीच्या सरपंच अरुणाताई घोडे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाषराव पोकळे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, शिरापूरचे सरपंच भास्करराव उचाळे, शरदवाडी चे सरपंच हरिभाऊ सरोदे, उपसरपंच विठ्ठल सरोदे, गणेश सरोदे, डॉ.पप्पू गांजे, ग्रामपंचायत सदस्य रामदास गांजे , बाबाजी जोरी, अशोक गांजे, सोसायटीचे चेअरमन वासुदेव सरोदे, जनार्दन सरोदे , संचालक कोंडीभाऊ पोकळे, शिवाजी मेरगळ, पोपट गांजे, विश्वास सरोदे, माजी चेअरमन अंकुश गांजे , माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता सरोदे, पुणे पोलीस रामदास मेरगळ,भास्कर गांजे, के.टी. जोरी सर, भाऊ गांजे ,भास्कर गांजे, ठकाजी गांजे,स्वप्निल गांजे, स्वप्निल सरोदे, दशरथ जोरी, भाऊसाहेब जोरी, गणेश मेरगळ, विक्रम सरोदे, सतिष सरोदे, रविशेठ सरोदे, माऊली सरोदे, विकास सरोदे, रवी गावडे ,डॉ. भरत सरोदे, पांडुरंग सरोदे ,पोपट सरोदे, संदीप खाडे , प्रथमेश खाडे , निखिल थोरात , अविष्कार थोरात ,आकाश शिंदे, अनिकेत सरोदे ,गंगाराम गांजे ,प्रकाश गाडे ,जानकु सरोदे ,प्रीतम गांजे, लक्ष्मण सरोदे, चैतन्य गांजे ,सुधीर सरोदे ,रोहित सरोदे, टाकळी हाजीचे तंटामुक्ती अध्यक्ष पारभाऊ गावडे आणि शरदवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शत्रुघ्न सरोदे आणि माऊली गांजे यांनी स्पर्धेचे उत्कृष नियोजन केल्याबद्दल दामूआण्णा घोडे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.