निवृत्त सैनिक आणि पोलीस अधिकारी यांचा टाकळी हाजीत सन्मान
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शासनाच्या मेरी मिट्टी मेरा अभिमान उपक्रमाअंतर्गत टाकळी हाजी (ता.शिरूर) ग्रामपंचायत कार्यालयात निवृत्त सैनिक आणि पोलीस अधिकारी यांचा सोमवारी (दि.१४) सन्मान करण्यात आला.
पोलीस दलातील दत्तात्रय रंगनाथ पवार , दिलीप दत्तात्रय पवार, दशरथ रभाजी चोरे ,बाबाजी श्रीपती गावडे या निवृत्त अधिकारी , कर्मचारी यांचा तसेच निवृत्त सैनिक चांदा मुक्ता साठे, बाबाजी रामभाऊ खामकर, दौलत रामभाऊ खामकर, यशवंत मारुती खामकर, कादर शाबुद्दिन पठाण, काशिनाथ भाऊसाहेब खामकर, सचिन मच्छिंद्र शिनलकर, रमेश सोनबा खामकर, रमजान अकबार पठाण, एकनाथ जानकू चोरे, संभाजी गंगाराम पवळे, रामचंद्र मारुती पाराठे या निवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा संमना करण्यात आला.
यावेळी सरपंच अरुणाताई घोडे,उपसरपंच गोविंद गावडे,
निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, ह. भ. प. भाऊसाहेब महाराज चोरे, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, तंटामुक्ती अध्यक्ष पारभाऊ गावडे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे, विलास साबळे, भरत खामकर, अशोक गावडे , अर्जुन खामकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे तसेच प्रगतशील शेतकरी शंकर थोरात, बाळासाहेब जाधव, सोनबा खाडे, तुकाराम घोडे, रोहिदास घोडे, रामभाऊ नरवडे, बबन चोरे, सुभाष चोरे, बापु होणे, पोपट घोडे, किसन मेरगळ,नामदेव लोखंडे, म्हतारबा खाडे,संजय खामकर, विठ्ठल खामकर, रामदास खाडे, सागर घोडे,संतोष बोखारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळी हाजी येथे सैन्य व पोलीस दलातील जवानांना कार्यालय, तसेच ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम साहित्यासह उद्यान उभे करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
….. अरुणा घोडे सरपंच टाकळी हाजी