प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी पदी टाकळी हाजीतील तिघांची वर्णी
टाकळी हाजी : प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी पदी टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील तीन शिक्षकांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रतोद पदी आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे, तालुका कार्याध्यक्ष पदी राहुल घोडे, तालुका संपर्क प्रमुख पदी बाबाजी हिलाळ यांची निवड झाली आहे.
तीनही शिक्षकांचे संघासाठीचे योगदान विचारात घेवून या निवडी करण्यात आल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी आमदार पोपटराव गावडे,टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे , बन्सीशेठ घोडे, प्रभाकर गावडे यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.