न्यायालयातील गीता शाळेत आली तर गुन्हेगारी थांबेल

ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांचे मार्मिक प्रतिपादन

0

शिरूर | शाळेत नसणारे ग्रंथ न्यायालयात ठेवले जातात ; न्यायालयातील गीता जर शाळेत आली, तर कोर्टात जाण्याची वेळच येणार नाही. गीतेतील सत्य, धर्म, कर्तव्य आणि विवेक ही मूल्ये शालेय शिक्षणात रुजली, तर शिक्षण अधिक संस्कारक्षम होईल आणि समाजातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा ठाम विश्वास ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांनी व्यक्त केला.

सविंदणे (ता. शिरूर) येथे दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांच्या प्रभावी कीर्तन-उपदेशाने भाविकांना अंतर्मुख केले. समाजातील वाढता नैतिक ऱ्हास, शिक्षणातील संस्कारांची उणीव आणि पसरत चाललेली गुन्हेगारी यावर त्यांनी थेट व नेमके भाष्य केले.

यावेळी त्यांनी पालकांचे संस्कार, युवावर्गातील संभ्रम, स्वार्थी प्रवृत्तीचा वाढता प्रभाव तसेच भक्ति आणि सदाचाराचे महत्त्व यावरही हृदयाला भिडणारे मार्गदर्शन केले. कीर्तनातील उदाहरणे आणि उपदेशामुळे सभामंडप टाळ्यांच्या कडकडाटाने वारंवार दुमदुमून गेला.

अखंड हरीनाम सप्ताहाचे औचित्य साधून परिसरात भक्तिमय उत्साह निर्माण झाला असून दत्तजयंती उत्सवाचे अध्यात्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.