कवठे येमाई माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सोपान वागदरे

उपाध्यक्षपदी दत्ताभाऊ मुंजाळ

0

शिरूर |  रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस, कवठे येमाई (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी निवड शांत व लोकशाही पद्धतीने शुक्रवारी (दि. १४) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत सोपान वागदरे यांची अध्यक्षपदी, दत्ताभाऊ मुंजाळ यांची उपाध्यक्षपदी, अनिल रायकर यांची कोषाध्यक्षपदी तर प्राचार्य जगदीश टिकले यांची सचिवपदी सर्वानुमते निवड झाली. प्रमुख सल्लागार म्हणून संस्थेचे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी, तसेच संजय चौधरी व प्रकाश इचके यांची निवड करण्यात आली.

निवड सभेस माजी पंचायत समिती सदस्य डॉ .सुभाष पोकळे, सुदामभाऊ इचके, सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर, पांडुरंग भोर, रितेश शहा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वागदरे, सामाजिक कार्यकर्ते जवाहरलाल बाफना, बाजीराव उघडे, भरत भोर, आबा वागदरे, गुलाब वागदरे, किसन हिलाळ, अमोल ढोरके, ग्रामपंचायत सदस्य रामदास इचके, येस क्लब उपाध्यक्ष डॉ. संतोष उंचाळे, भारत वागदरे, अमोल शिंदे, संतोष वागदरे, रामदास रोहिले, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या काळात विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अधिक प्रभावी उपक्रम हाती घेणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोपान वागदरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जगदीश टिकले यांनी केले. सूत्रसंचालन शिवराम मुंजावडे यांनी तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र करंजकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.