चौफुला पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव लोखंडे
टाकळी हाजी
कुकडी पाटबंधारे उपविभाग नारायणगाव अंतर्गत मीना सिंचन शाखा कालवा टाकळी हाजी शाखेच्या चौफुला पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष पदी टेमकरवस्ती येथील नामदेव गेणु लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे,मीना सिंचन शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे , बन्सी घोडे,म्हतारभाऊ खाडे,मंगेश खोमणे,अशोक मेचे,बबन किऱ्हे,संभाजी पवळे, भाऊ टेमकर,गणेश भोसले, सतीश घोडे आदी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
सर्व सभासदांना बरोबर घेऊन संस्था नावारूपाला येईल तसेच योग्य नियोजन करून पाण्याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.