नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
टाकळी हाजी : प्रतिनिधी
नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील दुडेवस्तीतील गरजू मुलांना सरपंच शशिकला अमोल घोडे आणि गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा सुमन साळवे , सहकारी पठाण मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले..यावेळी मुख्याध्यापक शांताराम पवार ,सहशिक्षक राहुल घोडे, पद्माकर काळे तसेच दुडेवाडीतील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला बचत गट ,महिला आर्थिक विकास, महिला दुर्बल घटकांवर काम करणे ,मुलांचा विकास करणे, वंचित मुलांकडे शिक्षणाची आवड निर्माण करणे ,युवक विकास ,आर्थिक विकास, मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणे ,वेगवेगळे ट्रेनिंग घेऊन व्यवसायाकडे वळवणे, अंधश्रद्धा निर्मूलन , कोणाचेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये ,वीटभट्टी कामगार ,मच्छीमारी कामगार, ऊसतोड कामगार ,महिलांना व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेऊन देणे, व्यावसायिक ट्रेनिंग देणे अशा प्रकारची धोरणे नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.
महिला सक्षमीकरण आणि दुर्बल घटकांच्या सामाजिक तसेच सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेऊन नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत राहणार आहे.
सुमन साळवे , संस्थापक अध्यक्षा