टाकळी हाजी तलाठ्याचा अजब कारभार

0

 

टाकळी हाजी : वृत्तसेवा

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील कामगार तलाठी अनेकदा कार्यालयात उपलब्ध नसतात,तसेच त्यांच्याकडून कामात अनेकदा तांत्रिक अडचणी मुळे चुका होतात. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने त्यांच्या कर्तव्याबाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत आहेत.

अनेकदा शेतकरी काम घेवून गेले तर मंडल अधिकारी यांचे कारण सांगून त्या कामात टाळाटाळ करण्यात येते.तसेच कामास विलंब लावला जातो. काही शेतकऱ्यांची नोंदीची कामे करताना या तलाठ्याच्या चुकांमुळे दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाला चकरा माराव्या लागत आहेत. तलाठी आणि मंडल अधिकारी संगनमताने मुद्दामहून असे प्रकार करत होते अशी चर्चा दबक्या आवाजात येथील नागरिकांमधून होत आहे.

येथील शिवाजी वरखडे यांची शेतजमीन सोमनाथ सखाराम वरखडे, संतोष सखाराम वरखडे, गणेश सखाराम वरखडे यांच्या तिघांच्या नावे नोंद करणेकामी सर्व पूर्तता करूनही कामास अनेक दिवस विलंब केला गेला , तसेच शिवाजी वरखडे यांचे नाव कमी करण्याऐवजी सोमनाथ वरखडे यांच्याच नावास काट मारली गेली. याबाबत चौकशी केली असता माझ्याकडून नजर चुकीने झाले आहे असे तलाठ्यांनी सांगितले.

जाणूनबुजून अपेक्षेपोटी तलाठ्यांनी चुका केल्या असून यामुळे मला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सोमनाथ वरखडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.