साबळेवाडी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडीतील शेतकरी मोहन किसन साबळे यांच्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने उसात पोबारा केला.
शनिवारी (दि.२४) दुपारी चारच्या सुमारास साबळे हे घराजवळ शेळ्या चारण्यासाठी शेतात घेऊन जात असताना अचानक बिबट्याने कळपातील शेळीवर हल्ला करून त्यांच्या समक्ष जवळच असलेल्या उसाच्या शेतात ओढून नेले.
बरेच दिवस या भागातील हल्ले थांबल्याने शेतकरी वर्गातील बिबट्याचे भय कमी झाले होते. या हल्ल्यामुळे साबळेवाडीतील शेतकरी भयभीत झाले असून येथे वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विलास साबळे यांनी केली आहे.