दामूशेठ घोडे ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित
टाकळी हाजी : प्रतिनिधी
संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिन्नर (जि. नाशिक) येथे शनिवारी (दि.२४) बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर सानप,सचिव गणेश सांगळे, खजिनदार रोशन सानप ,आदी संस्थेचे पदाधिकारी तसेच सोमनाथ वरखडे, गणेश घोडे उपस्थित होते.
दामुशेठ घोडे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या कार्याची ही पावती असल्याचे निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे यांनी सांगितले. सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे,सोसायटी अध्यक्ष बन्सीशेठ घोडे,उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.