शिरूर तालुक्यातील डॉक्टरांकडून वारकऱ्यांची सेवा
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल व जांबुत येथील समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप करण्यात आली.
तुकोबारायांच्या पालखीचे गुरूवारी इंदापूर येथे आगमन झाले. पालखी सोहळ्यातील कवठे येमाई, जांबुत , कान्हूर मेसाई , फाकटे, आळे या गावांतील दिंड्यांना भेट देऊन डॉक्टर शुभम बाराहाते डॉ. दत्तात्रय डुकरे , डॉ. प्रतीक भालेकर , योगेश चव्हाण, राहुल जगताप, सुरेश पाबळे यांनी वारकऱ्यांची मोफत तपासणी करून औषधे वाटप करण्यात आले.
आपल्या हक्काच्या डॉक्टरांनी थेट दिंडीत येऊन तपासणी केल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत दिंडी मंडळांकडून त्यांचे आभार व्यक्त केले.