विद्यार्थी दशेत नैतिक मुल्ये आत्मसात करा – डॉ.रसूल जमादार
जांबूत प्रतिनिधी : दि.१०
जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय, वेळ आणि नैतिक मुल्ये या घटकांना महत्व देणे आवश्यक आहे. जीवनाच्या प्रवासात मार्गक्रमण करताना सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकदा गेलेली वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे प्रत्येकाने नैतिक मूल्ये अंगिकारली पाहिजेत. म्हणून जीवन यशस्वी बनवायचे असेल तर जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन डॉ. रसूल जमादार यांनी केले. जांबूत (ता.शिरूर) येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आदर्श ग्रामविकास विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जगताप, प्राचार्य गणेश गुंजाळ, परीक्षा विभागप्रमुख प्राध्यापक उल्हास खांडगे, प्रा.संदीप डेरे, प्रा.सोपान ठुबे, प्रा.मिलिंद कांबळे, प्रा.सोमनाथ शिकदाळे, सांस्कृतिक विभागप्रमुख मनीषा शिस्तार, प्रा.श्वेता लाड, प्रा.निर्मला कोकाटे , प्रा.निर्मला पाबळे, प्रा. अश्विनी सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिवाजी जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील महत्वाच्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी मुक्ता शिंदे, सुवर्णा पाटे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुश्री सोनवणे हिने केले, तर पूनम सरोदे हिने आभार मानले.