पिंपरखेड येथे फिनिक्सच्या बालचमूंची आनंदभरारी
पिंपरखेड प्रतिनिधी : दि.१०
पिंपरखेड (ता.शिरूर) येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयमच्या बालचमूंनी आपला कलाविष्कार दाखवत आनंदोत्सव साजरा केला. लहान लहान चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य सुसिता बऱ्हाटे यांनी दिली. मागील शैक्षणिक वर्षात पिंपरखेड येथे फिनिक्स या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलची स्थापना करण्यात आली असून नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आदि वर्गाना या ठिकाणी शिक्षण दिले जात आहे. ( दि.६) रोजी श्री दत्त मंदिर सभागृहात ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे यांचे अध्यक्षतेखाली हा बालआनंद मेळावा संपन्न झाला. प्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेटीक्युलस रिसर्चचे एम.डी. खुशाल बोंबे, कानिफनाथ उद्योग समूहाचे एम.डी. युवराज गावशेते यांचेसह शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश गुजर, संचालक नारायण ढोमे, विद्यालयाचे प्राचार्य आर.के.मगर, मुख्याध्यापक पी.सी.बारहाते, प्रभाकर शेळके, किरण ढोमे, कैलास बोंबे, राजेंद्र बोंबे तसेच विद्यालयातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन बऱ्हाटे यांनी केले, तर आभार प्रा.गायत्री डुकरे , प्रा.ज्योती बोंबे यांनी मानले.