टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता माळी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (दि. १२) राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा पाटस (ता. दौंड) येथे आयोजित केला आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमर बोराटे यांनी ही माहिती दिली.
महात्मा फुले सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर लिंगे यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त वधू-वर व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.