दिलीपशेठ सोदक : निघोज नागरी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दिलीप नाथू सोदक यांची निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. दि. २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या संस्थेच्या निवडणुकीत त्याची निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. अ.नगर जिल्ह्यातील नावाजलेली पतसंस्था असा नावलौकीक असलेल्या निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शांताई उद्योग समुहाच्या माध्यमातून ३० हजार लि. दुध संकलन करणारी टाकळी हाजी भागातील सर्वात मोठी संस्था सोदक चालवत आहेत. गोरगरीबांसाठी नेहमीच मदतीला धावणारे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीने सर्वसामान्य तसेच व्यावसायिक आणि दुध उत्पादकांना फायदा होणार आहे.
परिसरातील नवोदित व्यावसायिकांसाठी आणि दुध उत्पादकांना अर्थिक मदत मिळवून देवून त्यांना हातभार लावणार आहे.
दिलीपशेठ सोदक
अध्यक्ष , शांताई उद्योग समूह/ नवनिर्वाचित संचालक , निघोज नागरी पतसंस्था