टाकळी हाजी येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य,वैयक्तिक स्वछता विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

 

टाकळी हाजी येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य,वैयक्तिक स्वछता विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

टाकळी हाजी

जागतिक कन्या दिवसाचे औचीत्य साधून मॅजिक बस इंडिया फौंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी हाजी , (ता शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात किशोरवयीन मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, इ विषयांच्या माहितीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

मुलींचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे,यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे.असे मत प्राचार्य आर. बी. गावडे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली व आवश्यक पायरी असून, तिची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. उलट स्त्रीला मिळालेले ते एक वरदान आहे. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्त्रीने आनंदाने स्विकारावे. या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून स्वच्छतेची व पुरेशा विश्रांतीची गरज असते.तसेच किशोरींना वयानुसार होणारे शारीरिक बदल, तसेच आरोग्याची निगा राखण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे व गावडे विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅजिक बस चे प्रमुख उमेश साळवे, आभार कल्याणी जाधव यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.