शिष्यवृत्ती परीक्षेत दिपाली तांबे जिल्ह्यात ४८ वी
शिरूर तालुक्यातील आदर्श विद्यालय वरुडे ची विद्यार्थीनी
शिरूर : प्रतिनिधी (दि.१६)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यातील वरुडे येथील आदर्श विद्यालयाची दिपाली संतोष तांबे हिला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तिचा शिरूर तालुक्यात २० वा आणि पुणे जिल्ह्यात ४८ वा क्रमांक आला असून तिला २९८ पैकी २४६ गुण मिळाले आहेत.
या शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक अंबरनाथ भरणे याला १८६ , संस्कार बाळासो काळे १७२, संस्कृती पप्पू कर्डिले १६६ , प्रतिक्षा अनिल भरणे १५८, श्रावणी संतोष डांगे १५६ ,स्वप्निल राजाराम भोसले १५२ , गवारी प्रज्ञा संतोष १४८, संस्कृती रत्नाकर फंड १४४ गुण मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नामदेव चौधरी व सहशिक्षक शुभम गाडीलकर ,अशोक ढोबळे, संजय निकम यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक , पालक , तसेच गावातील आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,चेअरमन , व्हाईस चेअरमन , संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील, शालेय समिती पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक – शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.