पिंपरखेड येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीर.
श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
पिंपरखेड : प्रतिनिधी
पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथे श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले.
पहाटे शुभ प्रभात, योगा, प्रभात फेरी, चहा नाष्टा, श्रमदान, भोजन, विश्रांती, व्याख्याने, गटचर्चा भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शुभरात्री अशा दिनचर्येतून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पिंपरखेड ग्रामवासियांना आदर्श घालून दिला. या शिबिरादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक यांनी पिंपरखेड येथील स्मशानभूमीतील साफसफाई, तसेच ग्राम स्वच्छता तुकाई माता व दत्त मंदिर परिसर स्वच्छता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर स्वच्छता आणि स्मशानभूमी व जिल्हा परिषद प्राथमीक शाळेतील वृक्षारोपण इत्यादी श्रमदानाची कामे शिबिर कालावधीमध्ये केली. शिबिर कालावधीमध्ये श्रमदानाबरोबरच, राष्ट्रीय स्वयंसेवकांसाठी विविध तज्ञ मार्गदर्शकाच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
“युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास” संकल्पना घेऊन हे शिबिर संपन्न झाले.याप्रसंगी प्रवीण गायकवाड, उपसरपंच विकास वरे, माऊली ढोमे, किरण ढोमे, प्रा.प्रल्हाद शिंदे, बाबुराव राक्षे इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. शिबिरार्थी विद्यार्थी कु.पवन पवार, गौरी सरजीने, ओमकार खामकर, निकिता पानसरे या विद्यार्थ्यांनी शिबिर कालावधीमध्ये ग्रामवासियांसोबत घातलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला.भविष्यामध्ये या सर्व स्वयंसेवकांना ग्रामस्थांनी भावी वाटचालीस व कार्य शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी सरपंच राजेंद्र दाभाडे,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अरुण ढोमे, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अखिलेश यादव,प्रा. प्रल्हाद शिंदे,उपाध्यक्ष नवनाथ पोखरकर, माऊली ढोमे,बाळासाहेब ढोमे, रंगनाथ शेळके,पी.सी बारहाते, सुभाष कोरडे, प्रा सचिन बराटे तसेच दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील प्रा.अनिल पडवळ, प्रा. सुभाष घोडे, प्रा.प्रकाश कांबळे, प्रा.आशिष गाडगे, प्रा ज्योती गायकवाड, नीलम गायकवाड , प्रा. माधुरी भोर, प्रा.नंदा आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचेप्रास्ताविक डॉ. दत्तात्रय चव्हाण, सूत्रसंचालन डॉ.शाकुराव कोरडे आणि प्रा.मोनिका जाधव यांनी आभार मानले.