श्रद्धा घोडे हिस गतका स्पर्धेत सुवर्णपदक

टाकळी हाजी च्या शिरपेचात मानाचा तुरा

0

श्रद्धा घोडे हिस गतका स्पर्धेत सुवर्णपद

टाकळी हाजी 

टाकळी हाजी तालुका शिरूर येथील कु.श्रद्धा नामदेव घोडे या विद्यार्थ्यीनीने गतका असोसिएशन ऑफ नॅशनल यांच्या मान्यतेने गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित चौथ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२२ या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

रविवारी (दिनांक ९) रोजी परभणी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या विद्यार्थ्यीनीने सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिला तिचे पालक नामदेव घोडे गुरुजी व शिक्षक रविंद्र बनगैया यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. याबद्दल तिचे टाकळी हाजी चे सरपंच अरूणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे, दामू आण्णा घोडे प्रतिष्ठान यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.