श्री दत्त माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पिंपरखेड : प्रतिनिधी
शाळेतील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी त्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी यासाठी श्रीदत्त माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथे आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा, रांगोळी,वक्तृत्व स्पर्धा व वैज्ञानिक उपकरणे यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्री दत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारामध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.दादाभाऊ बरकले,प्रा.विलास कुरकटे यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विज्ञानासंबंधित प्रश्नमंजुषा,वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी, व वैज्ञानिक उपकरणे या मध्ये विद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेतील मुलांच्या मनातील संकल्पना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून कृतीतून पहायला मिळाली.विज्ञान प्रदर्शन उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची गट निहाय परिक्षण करुन प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
वैज्ञानिक उपकरणे
गट इ.५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक – आदित्य बाबाजी टेकुडे व ज्ञानराज भाऊ बोंबे द्वितीय क्रमांक – प्रेम विजय भाकरे व संस्कार विजय भाकरे तृतीय क्रमांक – अर्णव अमित बडे व जयेश चंद्रकांत बोंबे उत्तेजनार्थ – प्रतीक बबन शिकेतोड व ओम बबन पोखरकर
गट इ.८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक – संस्कार राजेंद्र खांडगे व आर्यन संदीप भोसले द्वितीय क्रमांक – कीर्ती शरद बोंबे, तृतीय क्रमांक – कुणाल संदीप मोरे व कुणाल कोंडीबा पोखरकर,उत्तेजनार्थ – तुषार ज्ञानेश्वर ढोमे व श्रेयश रमेश गावशेते आणि ऋषिकेश नवनाथ भाकरे
गट इ.११ वी व इ.१२ वी
प्रथम क्रमांक – साक्षी अशोक गावडे व प्रांजल हनुमंत वरे द्वितीय क्रमांक – तुषार नवनाथ पोखरकर व सिद्धेश्वर मच्छिंद्र पोखरकर, तृतीय क्रमांक- सौरभ जालिंदर शिनारे व अजय संतोष ढोमे, उत्तेजनार्थ – समाधान संतोष पोखरकर व सुजय संतोष येवले.
रांगोळी स्पर्धा
गट इ.५ वी ते इ.७ वी
प्रथम क्रमांक – सुदर्शनी ज्ञानेश्वर ढगे व सोनाक्षी अशोक खळे द्वितीय क्रमांक – समृद्धी अनिल पिंपळे व तनिष्का विकास ढोमे, तृतीय क्रमांक – तेजल विकास गावशेते व समीक्षा सुधाकर टेमकर, उत्तेजनार्थ – कार्तिकी कोंडीबा पोखरकर व दिव्या गोसावी
गट इ.८ वी ते इ.१० वी
प्रथम क्रमांक – स्नेहा मंगेश ढोमे व आकांक्षा राजेंद्र मोहिते, द्वितीय क्रमांक – तेजस्वी संतोष बोऱ्हाडे व तनुजा अरुण सोनुले, तृतीय क्रमांक – स्नेहा कोकणे व सायली कातारी उत्तेजनार्थ – निशा मारूती मिडगुले व दिशा दिपक हडवळे
गट इ.११वी व १२ वी
प्रथम क्रमांक – ऋतुजा बबन पोखरकर व प्रीती बबन शिकेतोड द्वितीय क्रमांक – निशा भरत पोखरकर व स्वरांजली हनुमंत वरे तृतीय क्रमांक – दीक्षा सुरेश ढोमे व वृषाली अनंत बोंबे उत्तेजनार्थ – सृष्टी नवनाथ भाकरे व स्नेहा दिनकर बारवेकर
वक्तृत्व स्पर्धा
गट इ.५ वी ते इ.७वी
प्रथम क्रमांक – समृद्धी अनिल पिंपळे, द्वितीय क्रमांक – सुदर्शनी ज्ञानेश्वर ढगे, तृतीय क्रमांक- तनिष्का विकास ढोमे उत्तेजनार्थ- श्रुतिका प्रकाश बोंबे
गट इ.८वी ते १० वी
प्रथम क्रमांक – कीर्ती शरद बोंबे, द्वितीय क्रमांक – सादिया इब्राहिम पठाण, तृतीय क्रमांक – दिशा दीपक हाडवळे उत्तेजनार्थ – प्राजक्ता गावशेते
गट इ.११वी ते इ.१२ वी
प्रथम क्रमांक – ऋषिता श्रीहरी पोखरकर, द्वितीय क्रमांक – तनिष्का नरेश ढोमे, तृतीय क्रमांक – सृष्टी नवनाथ भाकरे उत्तेजनार्थ-अक्षदा संजय बोंबे
प्रश्न मंजुषा स्पर्धा
गट इ.५ वी ते इ.७ वी प्रथम क्रमांक – अर्णव अमित बडे व अर्जुन तुकाराम नरवडे,गट इ.८ वी ते इ.१० वी प्रथम क्रमांक – ज्ञानेश्वरी विनय वरे व मयुरी शरद बोंबे,गट इ.११ वी ते इ.१२ वी प्रथम क्रमांक- ऋतुजा पोखरकर व गायत्री दाभाडे
विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्राचार्य आर.के.मगर यांनी दिली.विज्ञान शिक्षक प्रा.दत्तात्रय सोनार व प्रा.इंद्रभान भोर यांच्या नियोजनात विज्ञान प्रदर्शन पार पडले.सुत्रसंचालन एफ.एन.पंचरास व आभार प्रा.सचिन बऱ्हाटे यांनी मानले.